प्रतिनिधी/ बेळगाव
गृहरक्षक दलाचे कमांडंट डॉ. किरण रुद्रा नायक यांना मुख्यमंत्री पदक बहाल करण्यात आले. शुक्रवार दि. 22 सप्टेंबर रोजी बेंगळूर येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या हस्ते त्यांना मुख्यमंत्री पदक देण्यात आले.
28 जानेवारी 2019 पासून डॉ. किरण हे गृहरक्षक दलाचे जिल्हा कमांडंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या उत्तम सेवाकार्याबद्दल मुख्यमंत्री पदक जाहीर झाले होते. शुक्रवारी अग्निशमन दल, गृहरक्षक दल व राज्य आपत्ती निवारण दलाच्या कर्मचाऱ्यांना बेंगळूर येथे झालेल्या पथसंचलन समारंभात मुख्यमंत्री पदक बहाल करण्यात आले.