क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मराठी विद्यानिकेतन, बेळगाव आयोजित क्रीडा स्पर्धाना मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ कुस्तीपटू व प्रशिक्षक काशिराम पाटील, वेटलिफ्टिंगचे एनआयएस प्रशिक्षक सदानंद मालशेट्टी आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांची ओळख क्रीडा शिक्षक पुजा संताजी यांनी करून दिली.
प्रमुख पाहुण्यांना क्रांती, ज्योती, भारती, प्रगती या गटांनी पथसंचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. राज्यस्तरावरती चमक दाखविलेल्या कुस्तीपटू गौतमी पाटील, सिध्दी निलजकर, वर्धन पाटील, बुद्धीबळपटू तन्मयी पावले, मल्लखांबपटू मानसी पाटील यांनी क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. अनुष्का पाटील हिने सर्व खेळाडूंना शपथ दिली.
प्रमुख पाहुणे मालशेट्टी व काशिराम पाटील यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जी. व्ही. सावंत, शिक्षण संयोजिका निला आपटे, क्रीडाशिक्षक महेश हगिदळे, दत्ता पाटील, पुजा संताजी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका श्रीमती उषा काकतकर यांनी केले. आभार क्रीडाशिक्षक दत्ता पाटील यांनी केले.