बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी व एसबीआय म्युच्युअल फंडमध्ये व्यावसायिक करार करण्यात आला. म्युच्युअल फंडसोबत एम्पॅनलमेंट प्रक्रिया कार्यरत करण्यात आली. एसबीआय म्युच्युअल फंड भारतातील प्रमुख फंडांपैकी एक आहे. या म्युच्युअल फंडचे राज्य प्रमुख शिवकुमार केतन, राहुल गवस व लोकमान्य सोसायटीचे सीईओ अभिजित दीक्षित, गोवा क्षेत्रिय व्यवस्थापक कुमार प्रियोळकर, म्हापसा प्रादेशिक व्यवस्थापक आग्नेलो कार्व्हालो यांच्या उपस्थितीत हा व्यावसायिक करार हॉटेल सूर्यकिरण हेरिटेज पणजी येथे करण्यात आला. एसबीआय म्युच्युअल फंड मॅनेजमेंट हे भारतातील सर्वात जुने व आघाडीचे म्युच्युअल फंड आहे, जे बँकिंग उद्योगातील सर्वात विश्वासार्ह ब्रॅण्डपैकी एक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रायोजित केले आहे. सदर फंड विविध उत्पादनांची सेवा ग्राहकांना देते. सध्या 7.20 लाख कोटी व्यवस्थापन अंतर्गत मालमत्तांचे व्यवस्थापन करते. लोकमान्य सोसायटी व एसबीआय म्युच्युअल फंड आपल्या गुंतवणूकदारांसाठी नाविन्यपूर्ण आणि मजबूत गुंतवणुकींच्या पर्यायांची उपलब्धता करून देत आहेत. ग्राहक आणि भागीदारांना उत्तम गुंतवणुकीचा अनुभव आणि अतुलनीय सेवेचा लाभ मिळेल, असा विश्वास लोकमान्य सोसायटीचे सीईओ अभिजित दीक्षित यांनी यावेळी व्यक्त केला. लोकमान्य सोसायटी देशातील विविध नामांकित कॉर्पोरेट संस्थांसोबत व्यावसायिक करारातून आपल्या ग्राहकांसाठी सेवा देत आहे.
Previous Articleआरपीडीच्या प्राचार्यपदी डॉ.अभय पाटील
Next Article विविध मंडळांतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.