प्रतिनिधी/ बेळगाव
सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी आणि विमा क्षेत्रातील नामवंत कंपनी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स यांच्यात नुकताच व्यावसायिक करार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे सीईओ अभिजित दीक्षित म्हणाले, सहकार क्षेत्रातील दिग्गज लोकमान्य सोसायटी अन् विमा क्षेत्रातील लोकप्रिय कंपनी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स या दोन संस्था एकत्रितरीत्या आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देतील, याची खात्री आहे.
बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स ही भारतातील नामांकित विमा कंपनी आहे व त्यांच्या ग्राहक सेवाही लोकप्रिय आहेत. लोकमान्य सोसायटीचे 10 लाखांहून अधिक ग्राहक आहेत आणि हीच खरी लोकमान्य सोसायटीची लोकमान्यता आहे, असेही त्यांनी सांगितले. लोकमान्य सोसायटीच्या कॉर्पोरेट ऑफीसमध्ये झालेल्या समारंभास बजाज अलायन्सचे डिस्ट्रिब्युशन हेड रोहित जैन यांच्या समवेत नीरज शर्मा, श्रीपाद देऊळगावकर, लोकमान्य इन्शुरन्स हेड राहुल पाटील व लोकमान्य सोसायटीचे अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी रोहित जैन यांनी बजाज अलायन्सतर्फे उत्कृष्ट सेवेची ग्वाही दिली आणि दोन्ही संस्था मिळून अधिकाधिक ग्राहकोपयोगी जलद सेवा देतील, असे सांगितले.