37 पानी निवेदनात दहशतवादाचा 9 वेळा, युक्रेन युद्धाचा 4 वेळा उल्लेख
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या जी-20 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी सर्व सदस्य देशांनी एकमताने भारताने जारी केलेले जी-20 घोषणापत्र एकमताने स्वीकारले आहे. या घोषणापत्रात दहशतवादाचा 9 वेळा आणि युव्रेन युद्धाचा 4 वेळा उल्लेख करण्यात आला आहे. रशिया आणि युव्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर या घोषणेचा स्वीकार हे भारताच्या जी-20 अध्यक्षपदातील एक महत्त्वाचे यश आहे.
जी-20 नेत्यांच्या या संयुक्त घोषणापत्रामध्ये आजचे युग हे युद्धाचे युग नाही असे म्हटले आहे. यासोबतच जी-20 नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि अभिव्यक्तीचा निषेध केला. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी दहशतवाद हा सर्वात गंभीर धोका असल्याचे सर्व प्रतिनिधींनी मान्य केले. ‘कोणत्याही प्रकारचे दहशतवादी कृत्य, कुठेही, कोणत्याही स्वरूपात, कधीही समर्थनीय ठरू शकत नाही.’ असे या निवेदनपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. तसेच रशिया- युक्रेन युद्धाचाही त्यात संदर्भ देण्यात आला आहे. युव्रेन संघर्षाने देशांसाठी, विशेषत: विकसनशील आणि कमी विकसित देशांच्या धोरणांवर गुंतागुंत निर्माण केली आहे. सर्व देशांनी कोणत्याही देशाचा भूभाग त्याच्या प्रादेशिक अखंडतेविऊद्ध ताब्यात घेण्यासाठी बळाचा वापर करणे किंवा धमकी देणे टाळावे, असा उल्लेख निवेदनपत्रात आहेत. यासोबतच अण्वस्त्रांचा वापर किंवा धोका अस्वीकारार्ह असल्याचेही म्हटले आहे.
‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ला चालना
आम्ही जागतिक अर्थव्यवस्थेवर युद्धाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जाण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू आणि युव्रेनमध्ये सर्वसमावेशक, न्याय्य आणि चिरस्थायी शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व संबंधित आणि रचनात्मक पावलांचे स्वागत करू, असे स्पष्ट करत ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या भावनेने राष्ट्रांमधील शांततापूर्ण, मैत्रीपूर्ण आणि चांगले संबंध अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही निवेदनपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.त