कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यातील राजकीय भूकंपानंतर जिल्ह्यातील राजकारणात एकाकी पडलेले काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना सोबत येण्याची खुली ऑफर खासगीत दिली असल्याचा दावा राज्याचे कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला, कोल्हापुरात मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात गेली दीड दशक मित्र असलेले काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील आणि कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात राज्यामध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काहीसा दुरावा निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी मधील फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखालील एक गट थेट सत्तेत सहभागी झाला अजित पवारांसोबत मंत्रीपदाची शपथ घेतलेले पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे नेते सतेज पाटील हे मित्र रहावेत यासाठी आपण त्यांना खासगीत आमच्या सोबत येण्याचा सल्ला दिला आहे असं वक्तव्य करून खळबळ उडवून दिली.
मंत्रिमंडळाचे खातेवाटप काही वेळातच जाहीर होईल
राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत दिल्ली वारी करून आलेले मंत्री असून मुश्रीफ यांनी थोड्याच वेळात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, खाते वाटपाची यादी जाहीर झाल्यावर कोणते खाते कोणाकडे कळेल, भाजप आणि शिंदे गटात काय अडले आहे माहीत नाही, उपमुख्यमंत्री अजितदादांकडे कोणते खाते येईल हे तेंव्हाच समजेल मात्र राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकारमध्ये सर्वकाही अलबेल असल्याचे मुश्रीफ म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी आरोप केले पण माझी फक्त चौकशी झाली
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भर सभेत आरोप केले होते, मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा यांनी ईडी चौकशीवेळी आम्हाला गोळ्या घाला असं वक्तव्य केले होतं, आता तेच मुश्रीफ फ भाजपाच्या मंत्रिमंडळात या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत अशी टीका केली होती, मात्र या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंवर अजूनही प्रेम कायम असल्याचे मुश्रीफ म्हणाले.