वार्ताहर/बांदा
गेल्या अनेक वर्षांमध्ये विविध विषयांचे आकलन केले असता, समाज जागृती बाबत प्रयत्न व्हावे या एका उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जातींमधील बौद्ध आणि अधर्मांतरीत आंबेडकरी अनुयायी समाजामधील सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, रोजगार, स्वयंसेवी, व्यावसायिक आणि नोकरी मध्ये काम करणाऱ्या जबाबदार पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजातील प्रभावशाली व्यक्ती ( महिला/ पुरुष) या सर्वांची सहविचार सभा रविवार दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी, सकाळी १० वाजता ओरोस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,सिंधुदुर्ग नगरी येथे आयोजित करण्यात आली आहे .
तरी या सहविचार सभेसाठी अनुसूचित जातीतील सर्वच सामाजिक संघटना, धार्मिक संघटना, विविध राजकीय पक्ष, विविध कर्मचारी संघटना, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, निवृत्त अधिकारी कर्मचारी, आणि समाज्यातील अन्य प्रभावशाली व्यक्ती यांनी सदर बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन सहविचार सभेचे निमंत्रक रामदास जाधव ( सावंतवाडी), सत्यवान साठे सत्यवान,तेंडोलकर, नागेश कदम, अमोल पावसकर ,विष्णू तेंडोलकर, चंद्रकांत वालावलकर, सूर्यकांत बिबवनेकर, उमेश तेंडोलकर बाबली जाधव, दिनेश जाधव, सुधीर अणावकार ( सर्व कुडाळ),शामसुंदर वराडकर ( मालवण),महेश परुळेकर (वेंगुर्ला) यांनी संयुक्तरित्या केले आहे.