ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) या महत्वकांक्षी योजनेचा भाग असलेल्या ट्रान्स-हिमालयीन मल्टी-डायमेन्शनल कनेक्टिव्हिटी नेटवर्क अंतर्गत नेपाळसोबत क्रॉस-बॉर्डर रेल्वेसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी एकमत झाले आहे. या प्रकल्पासाठी चीनकडून $118 दशलक्ष गुंतवण्याचे वचन नेपाळला दिेले गेले आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री, वांग यी आणि त्यांचे नेपाळी समकक्ष, नारायण खडका यांच्यात बुधवारी चीनमधील किंगडाओ येथे बैठक झाली. “दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांच्या चर्चेदरम्यान क्रॉस हिमालय या बहुआयामी कनेक्टिव्हिटी नेटवर्क तयार करण्यावर सहमती दर्शवली आहे. चीन यासाठी निधी वापरून, नेपाळला रेल्वेच्या अभ्यासासाठी मदत करेल. वर्षभरात तज्ञांना संशोधनासाठी अभ्यासासाठी नेपाळला पाठवले जाईल”
या प्रकल्पामुळे भारताच्या सुरक्षततेवर प्रश्नचिन्ह उभा राहिल्याने भारताने नेहमीच या प्रकल्पाचा विरोध केला आहे. पण या योजनेच्या नावाखाली सामरिक महत्व वाढवण्यासाठी चीन ही योजना राबवण्यासाठी प्रयत्न करत आहे.