एस. एन. पाटील यांचे प्रतिपादन : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे जागतिक पर्यावरण दिन साजरा
वार्ताहर / किणये
अलीकडे जल, वायूसह पर्यावरणाच्या प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे. पर्यावरणाचे होत असलेले प्रदूषण हे मानवाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी तुमची-आमची सर्वांची आहे. हे आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लक्षात घेणे गरजेचे आहे. निसर्ग हे मानव, वन्यजीव, जलचर प्राणी, पक्षी अन् वनसंपत्ती यांना लाभलेलं वरदान आहे. या पार्श्वभूमीवर निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भाऊराव काकतकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील यांनी केले.
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव आणि भाऊराव काकतकर महाविद्यालय बेळगाव, ज्योती पदवीपूर्व महाविद्यालय बेळगाव, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ बेळगाव, चंदगड कोल्हापूर शाखा, बीबीए व बीसीए महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या पटांगणावर साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील होते.
प्रमुख पाहुणे म्हणून आयएएस उत्तीर्ण झालेल्या श्रुती यरगट्टी, निवृत्त प्राचार्य डॉ. डीएन मिसाळे, अध्यक्ष अॅड. राजाभाऊ पाटील, सचिव प्रा. विक्रम एल. पाटील, प्रा. निलेश शिंदे, प्रा अमित सुब्रमण्यम, माजी विद्यार्थी संघटना समन्वयक प्रा. डॉ. एम. व्ही. शिंदे, प्रा. डॉ. एम. एस. पाटील, प्रा. डॉ. डी. टी. पाटील, प्राचार्य डॉ. आर. डी. शेलार प्रा. आनंद पाटील, प्रा. डॉ. बसवराज कोळूचे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालय परिसरामध्ये विविध झाडे लावण्यात आली. झाडांचे महत्त्व पटवून त्याचे संवर्धन कसे होईल याची माहिती देण्यात आली.
स्वागत प्रा. डॉ. एम. एस. पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रा. शुभम चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप वाडेकर व सुनिल ताटे यांनी केले. प्रा. महादेव नार्वेकर यांनी आभार मानले.
यावेळी प्रा. अमित चिंगळी, प्रा. नारायण तोराळकर, प्रा सुरज पाटील, प्रा. बी. आय. वसुलकर, प्रा. निता पाटील, प्रा. अनिता पाटील, राजाराम हलगेकर, प्रा. व्ही. वाय पाटील आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.