कांदा, बटाटा, रताळी भाव स्थिर : सर्वसामान्यांची भाजीपाला खरेदी करताना काटकसर :
सुधीर गडकरी/ अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार पेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा, इंदूर, आग्रा बटाटा, जवारी बटाटा व रताळी यांचा भाव प्रति क्विंटल स्थिर आहे. तर भाजी मार्केटमध्ये पालेभाज्यांच्या आवकेत घट निर्माण झाली आहे. यामुळे भाजीपाल्यासह हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर यांच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्याना भाजीपाला खरेदी करताना काटकसर करावी लागत आहे. केंद्र सरकारने परराज्यामध्ये कांदा निर्यात करण्यावर काही अटी घालून कमी प्रमाणात निर्यात करण्यास परवानगी आंतरराष्ट्रीय खरेदीदारांना दिली आहे. काही ठराविक टनच कांदा इतर देशामध्ये निर्यात होतो. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याचा दर टिकून आहे. यामुळे देशातील विविध बाजारात महाराष्ट्रातील कांदा विक्रीसाठी जात आहे. महाराष्ट्रातून फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कांदा विक्री सुरू आहे. गेल्या चार महिन्यापासून महाराष्ट्र कांद्याची आवक सुरू आहे. शेतकऱ्यांकडील कांदा जवळपास संपत आला आहे. काही ठराविक शेतकरी कांदा साठवून ठेवतात. तसेच तेजी-मंदीचे व्यापारी मोठ्या प्रमाणात कांद्याची साठवणूक करून ठेवले आहेत. वाढीव दर मिळण्यास देशातील विविध बाजारात पाठवतात पावसाळ्यामध्ये कांदा दरात वाढ होण्याची शक्यता दर्शविली आहे. शनिवारी कांदा भाव क्विंटलला 500 ते 1700 रुपये झाला.
तालुक्यातील जवारी बटाटा आणि रताळी आवक जवळपास संपत आली आहे. शेतकरी शेती कामात व्यस्त आहे. शेती मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. पावसाला प्रारंभ होताच प्रथम पेरण्या करून पावसाळी बटाटा लागवडीला प्रारंभ करताता. पावसाला सुरुवात होताच जालंधर बटाटे बियांणे मागविण्यास प्रारंभ करतात. त्यानंतर आपापल्या शेतकऱ्यांना जालंधर बियाणांचे वाटप करतात. रताळी दर क्विंटलला 400 ते 500 रुपये आहे. तर जवारी बटाटा दर 300 ते 2200 रुपये आहे, अशी माहिती अडत व्यापारी बसवंत मायाण्णाचे यांनी दिली.
इंदूर-आग्रा बटाटा संपला
शेतामध्ये साठवून ठेवलेला इंदूर व आग्रा बटाटा संपला आहे. शितगृहामध्ये साठवलेला बटाटा विक्रीसाठी येत आहे. जवारी बटाटा आवक कमी झाल्याने खरेदीदार इंदूर-आग्रा बटाटा खरेदीकडे वळले आहेत, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.
सध्या पावसाने हुलकावनी दिली आहे. मे-जून महिन्यामध्ये पडणारा अवकाळी पाऊस देखील पडला नाही. यामुळे बेळगाव जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विहिरी, कूपनलिका, जलाशये यांची पाणीपातळी खालावली आहे. घटप्रभा परिसरामध्ये तर पाणी टंचाईमुळे भाजीपाला उत्पादन निम्म्यावर येऊन पोहोचले आहे. सध्या बेळगाव तालुक्यात देखील तशीच परिस्थिती असल्याने भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे. यामुळे हिरव्या भाजीपाला आवकेत तुटवडा निर्माण झाल आहे. भाजीमार्केटमध्ये मेथी, शेपू, कोथिंबीर, लालभाजी, टोमॅटो दरात वाढ झाल्याची माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.
भाजीपाला शेकडा भाव
घटप्रभा मेथी 1800 ते 1900 रु.
बेळगाव मेथी 1700 ते 1800 रु.
घटप्रभा कोथिंबीर 1800 ते 1900 रु.
बेळगाव कोथिंबीर 1600 ते 1700 रु.
हायब्रिड कोथिंबीर 1500 ते 1650 रु.
चायना कोथिंबीर 1600 ते 1700 रु.
घटप्रभा शेपू 800 ते 1000 रु.
बेळगाव शेपू 700 ते 800 रु.
बेळगाव लालभाजी 1000 ते 1200 रु.
घटप्रभा लालभाजी 1000 ते 1200 रु.
बेळगाव स्वीटकॉर्न 600 ते 800 रु.
घटप्रभा स्वीटकॉर्न 600 ते 800 रु.
घटप्रभा कांदापात 300 ते 400 रु.
बेळगाव कांदापात 300 ते 400 रु.
बेळगाव पुदीना 300 ते 350 रु.
घटप्रभा पुदीना 300 ते 400 रु.
लिंबू 150 ते 220 रु.
बेळगाव पालक 400 ते 500 रु.
घटप्रभा पालक 400 ते 500 रु.
नवलकोल 450 ते 500 रु.
भाजीपाला प्रति 10 किलो भाव
गवार 180 ते 240 रु.
घेवडा 400 ते 450 रु.
बीट 350 ते 380 रु.
इंदस ढबू मिरची 350 ते 400 रु.
इंदिरा ढबू मिरची 450 ते 500 रु.
बेंगळूर बिन्स 1000 ते 1200 रु.
मखमली बिन्स 1100 ते 1200 रु.
नाशिक बिन्स 1000 ते 1100 रु.
बेळगाव बिन्स 800 ते 1000 रु.
कारली 350 ते 380 रु.
पांढरी कारली 250 ते 300 रु.
भेंडी 200 ते 250 रु.
इंग्लिश गाजर 320 ते 360 रु.
बेळगाव गाजर 340 ते 360 रु.
साधी वांगी 180 ते 200 रु.
काटे वांगी 220 ते 250 रु.
बोळगी वांगी 200 ते 220 रु.
पांढरी वांगी 250 ते 300 रु.
हिरवी मिरची 400 ते 450 रु.
पांढरी मिरची 380 ते 400 रु.
काळी मिरची 420 ते 470 रु.
बेळगाव जी फोर मिरची 620 ते 650 रु.
बेळगाव बटका पांढरी मिरची 650 ते 700 रु.
बेळगाव बटका हिरवी मिरची 600 ते 650 रु.
मालिनी काकडी 320 ते 340 रु.
बेळगाव जवारी काकडी 320 ते 350 रु.
शिमला मटर 900 ते 1000 रु.
दुधी भोपळा प्रति डझन 200 ते 220 रु.
मुळा बंडल 25 ते 30 रु.
इंग्लिश फ्लॉवर डझन 300 ते 320 रु.
बेळगाव फ्लॉवर डझन 300 ते 320 रु.
कोबी 80 ते 85 रु. प्रति 10 किलो
सातारा अल्ले 1600 ते 1700 रु.
जवारी शिमोगा अल्ले 1900 ते 2000 रु.
गोल भोपळा प्रति क्विंटल 1000 ते 1200 रु.
टोमॅटो प्रति ट्रे 450 ते 500 रु.
महाराष्ट्र कांदा क्विंटल भाव
गोळी 800 ते 1000 रु.
मीडियम 1300 ते 1500 रु.
मोठवड 1400 ते 1600 रु.
गोळा 1600 ते 1700 रु.
कर्नाटक कांदा क्विंटल भाव
गोळी 300 ते 500 रु.
मीडियम 800 ते 1000 रु.
मोठवड 1000 ते 1200 रु.
गोळा 1200 ते 1300 रु.
पांढरा कांदा क्विंटल भाव
गोळी 1000 ते 1200 रु.
मीडियम 1600 ते 1900 रु.
मोठवड 2000 ते 2200 रु.
गोळा 2300 ते 2500 रु.
पांढरा जवारी बटाटा
गोळी 300 ते 350 रु.
मोठवड 1500 ते 2000 रु.
गोळा 2100 ते 2200 रु.
लाल जवारी बटाटा
गोळी 300 ते 350 रु.
मोठवड 1500 ते 2000 रु.
गोळा 2100 ते 2200 रु.
इंदूर बटाटा
गोळी 1000 ते 1500 रु.
मीडियम 1500 ते 1800 रु.
मोठवड 2000 ते 2200 रु.
गोळा 2200 ते 2350 रु.
आग्रा बटाटा
मीडियम 1200 ते 1400 रु.
मोठवड 1500 ते 1600 रु.
गोळा 1600 ते 1700 रु.
रताळी 400