सोमवारी 71 जणांचे अहवाल निगेटिव्ह : पुन्हा सतर्कता बाळगण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोना महामारीचा फैलाव सध्या पूर्णपणे आटोक्मयात असला तरी चौथ्या लाटेची भीती कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्य रक्षणासाठी पुन्हा सतर्कता बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले असून या पार्श्वभूमीवर सरकारने मास्कची सक्ती केली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. या उलट जिल्हय़ातील 71 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या 7 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. मृतांचा सरकारी आकडा 1001 इतका आहे.
आतापर्यंत जिल्हय़ातील 20 लाख 2 हजार 572 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 18 लाख 97 हजार 178 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 1 लाख 142 वर आहे. गेल्या एक-दीड महिन्यापासून कोरोनाचा फैलाव पूर्णपणे नियंत्रणात आहे. दरम्यान दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू आदी राज्यांतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने पुन्हा मास्कची सक्ती केली आहे. राज्य पातळीवरील तांत्रिक सल्लागार समितीने केलेल्या शिफारसीवरून प्रत्येकांने मास्क वापरणे सक्तीचे केले असून सार्वजनिक ठिकाणे, कार्यालये, प्रवास करताना कोरोना टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. मास्क न वापरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरकारने दिला असून किमान दोन फुटाचे सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन केले आहे.