Correct program of sand mafia in Aronda Savarjuwa Terekhol Bay!
आरोंदा सावरजुवा येथे तेरेखोल खाडीत बुधवारी महसूल विभागाने वाळू माफियावर धडक कारवाई केली .या कारवाईत होडीसह चार ब्रास वाळू जप्त करण्यात आली . वाळू उत्खनन करणारया कामगारांसाठी झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. त्या झोपड्या उध्वस्त करण्यात आल्या . वाळू काढण्यासाठी बांधण्यात आलेला रॅम्पही महसूल विभागाने उध्वस्त केला. वाळू उत्खनन करणारे कामगार पळून जाण्यात यशस्वी ठरले .वाळू भरलेला डंपर चालकासह फरार झालेला आहे तलाठी डी .पी पास्ते यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. वाळू उपसा करणाऱ्याचा शोध सुरू असून त्याच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे असे पास्ते यानी सांगितले तेरेखोल खाडीत बेकायदेशीररित्या वाळू उत्खनन होते .अशा तक्रारी गेले काही दिवस महसूल विभागाकडे आल्या होत्या त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. महसूल विभागाने पुढील कारवाईसाठी मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्याना पाचारण केले आहे. यावेळी पोलीस बंदोबस्त घेण्यात आला होता. यापूर्वी वाळू माफेवर कारवाई करण्यात आली होती त्यावेळी महसूल विभागाच्या पथकावर हल्ला करण्यात आला होता मात्र यावेळी महसूल विभागाने सावधरित्या कारवाई केली.
सावंतवाडी / प्रतिनिधी