‘नागा’ने जमविली जोडी
ट्रेंड फॉलो करत जवळपास सर्वच जोडपी आता विवाहापूर्वी प्री-वेडिंग शूट करवितात. यात जोडप्याला हिरो-हिरोइनप्रमाणे दाखविले जाते. याचमुळे प्री-वेडिंग फोटोशूटला विशेष अन् सर्वात अनोखे करण्यासाठी फोटोग्राफर्स नव्या संकल्पना घेऊन येत असतात. सध्या एका जोडप्याची छायाचित्रे व्हायरल होत आहेत, यात हे दोघेही जगातील सर्वात विषारी साप म्हणजेच कोब्रासोबत पोझ देताना दिसून येतात.
सोशल मीडियावर ही छायाचित्रे शेअर करण्यात आली आहे. यात 30 छायाचित्रे असून याद्वारे एक कहाणी सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एक मुलगी घराच्या पाठीमागे हिंडत असताना तिला कोब्रा दिसतो आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलत असल्याचे या छायाचित्रांद्वारे दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यानंतर साप पकडणाऱ्याला पाचारण केले जात असल्याचे छायाचित्रांद्वारे सांगण्यात आले आहे.
इम्प्रेस झाली युवती
यानंतर युवकाची स्कुटीवर बसून एंट्री होते, युवती त्याला सापाबद्दल सांगते आणि तो हीरोप्रमाणे सापाला पकडू लागतो. सापाला पकडून एका डब्यात बंद करतो. हे पाहून युवती आपण इम्प्रेस झाल्याचे दर्शवून देते. युवक साप घेऊन जातो आणि युवतीला इशाऱ्यांमध्ये आपण फोन करू असे सांगतो यानंतर दोघांमध्ये संभाषण सुरू हेते आणि दोघेही हातात हात घेऊन बागेत फिरताना दिसून येतात अशी कहाणी छायाचित्रांद्वारे मांडण्यात आली आहे.
छायाचित्रणाकरता वापरण्यात आलेला साप खरा असल्याचे मानले जात आहे. या छायाचित्रणाची संकल्पना अत्यंत मजेशीर असून लोक यावर व्यक्त होत आहेत. एका युजरने ‘नाग ने बना दी जोडी’ अशी कॉमेंट केली आहे. या छायाचित्रांना आतापर्यंत 5 लाखाहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. तर 2 हजरा जणांनी लाइक केले आहे.