नवी दिल्ली :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांना आता न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार आहेत. दिल्लीतील एका न्यायालयाने सुनीता केजरीवाल यांना समन्स जारी केला आहे. दोन विधानसभा मतदारसंघांमधील मतदारयादींमध्ये सुनीता यांचे नाव असल्याने न्यायालयाने हा समन्स जारी केला आहे. भाजप नेते हरीश खुराना यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली होती. सुनीता केजरीवाल यांनी जनप्रतिनिधित्व अधिनियमाचे उल्लंघन केल्याची तक्रार भाजप नेत्याने केली होती.
………………………………