नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतातील अनेक हिंदू संघटनांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ट्रूडो यांनी खलिस्तानवादी दशहतवादी निज्जर याच्या हत्येचे उत्तरदायित्व भारतावर टाकण्याचा प्रयत्न केला होता. याचा निषेध म्हणून हिंदू संघटनांनी संयुक्त हिंदू आघाडीच्या माध्यमातून येथे निदर्शनांचे आयोजन केले होते. या निदर्शनांना कार्यकर्ते आणि जनता यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
ट्रूडो त्यांच्या स्वार्थी आणि संकुचित राजकारणासाठी भारताला धोक्यात टाकत आहेत. ते खलिस्तानचे समर्थक असल्यासारखे वागतात. त्यांना खलिस्तान हवे असेल तर त्यानी कॅनडात एका भूभाग त्यासाठी द्यावा आणि तेथे खलिस्तानची स्थापना होऊ द्यावी, असे प्रतिपादन या निदर्शनांच्या वेळी करण्यात आले. हिंदू संघटनांनी या संदर्भातील एक निवेदन ट्रूडो यांच्यासाठी केले असून ते त्यांना देण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.