‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रमात आ. वैभव नाईक यांचे टीकास्त्र
वार्ताहर/ कुडाळ
जिल्ह्यातील अनेक विकास कामांना स्थगिती देण्याचे काम या सरकारने केले.राज्यातील मोठ-मोठे उद्योग गुजरातला पळविण्याचे काम या सरकारने केले. आज पेट्रोल, डिझेल, महागाई दर गगनाला भिडले आहेत. बेरोजगारी वाढत चालली आहे. चिपी विमानतळ आज बंद पडण्याच्या मार्गावर आहे. सिंधुदुर्गातील विदयार्थ्यांना तलाठी भरती परीक्षा केंद्र उपलब्ध नाही. कोरोना काळात काही लोकांनी तर राजकारण केले होते. अशी टीका ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी आज येथे केली.
आम्ही नऊ वर्षात काय केले. ते लोकांसमोर कधीही मांडू शकतो. कुठल्याही चर्चेला आपण उत्तर देऊ शकतो. असेही त्यांनी सांगितले.कुडाळ येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यालयासमोर बुधवारी ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी उपनेते गौरीशंकर खोत, गुरुनाथ खोत, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पडते,सतीश सावंत, जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप बोरकर, जिल्हा महिला आघाडी प्रमुख जानव्ही सावंत, युवा सेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, प्रदीप बोरकर, तालुका प्रमुख राजन नाईक, शहर प्रमुख संतोष शिरसाट, अमरसेन सावंत, रुपेश पावसकर, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका श्रेया गवंडे, सृती वर्दम आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.