Beetroot Juice : बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. यासाठी तज्ञ सांगतात की नेहमी आहारात कडधान्य, फळभाजी, पालेभाजी, सिझननुसार फळांचा वापर करा. यामुळे तुमचं वजनही नियंत्रणात राहील. याचसोबत आजार कमी करण्यास ही मदत होईल. मात्र धावपळीमुळे प्रत्येक गोष्ट फॉलो करणे शक्य होत नाही. तुम्हाला जर नियमित फळे खाणे शक्य होत नसेल तर तुम्ही फळांचा ज्यूस करून पिऊ शकता. ऑफिस वर्क करत असाल तर दुपारच्या जेवणाऐवजी तुम्ही ज्यूस घेऊ शकता. घरी असाल तर संध्याकाळी चहा ऐवजी ही ज्यूस घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला तीन प्रकारचे ज्यूसची रेसीपी सांगणार आहोत ज्यामध्ये केवळ फळेच नाही तर भाज्यांचा देखील समावेश आहे. चला तर जाणून घेऊया रेसीपी..
बीट ज्यूस-1
साहित्य
सफरचंद-1
बीट-2
गाजर- 7 ते 8
आद्रक- अर्धा इंचाचा तुकडा
पुदीना- आवडीनुसार
कृती
सुरवातीला सफरचंद, बीट, गाजराचे तुकडे करून घ्या. हे सर्व तुकडे सोबत आल्ले आणि पुदीनाची पाने ज्युसर किंवा मिक्सरमधून काढून घ्या. तयार झालेले मिश्रण गाळून घ्या. झाला ज्यूस तयार.
ग्रीन ज्यूस -2
साहित्य
काकडी किंवा दुधी भोपळा-2
पालक-मुठभर
पुदीनाची पाने- पाऊन कप
सफरचंद किंवा नासपती- 2
आद्रक- अर्धा इंच छोटा तुकडा
लिंबाचा रस- पाव चमचा
कृती
सगळ्या पदार्थांना कट करून मिक्समधून काढून घ्या. आता एका कपड्यातून गाळून घ्या. यात आता लिंबाचा रस घाला.
संत्री ज्यूस
साहित्य
गाजर-2
संत्री-2
पपई- कट केलेली पपई 3 कप
आद्रक- पाव इंच
टीप- हा ज्यूस तुम्ही सकाळी व्यायाम केल्यानंतर, संध्याकाळी चहा ऐवजी किंवा उपहासावेळी देखील घेऊ शकता.या ज्यूसमध्ये साखर, चाट मसाला आणि मिठ घालू नका. याचशिवाय ज्यांना मधूमेह आहे त्य़ांनी हा ज्यूस घेऊ नये.