बाजारात आवक, पूजनासाठी खरेदी
बेळगाव : गणेशोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. त्याबरोबरच गौरी आणि पूजांसाठी भोपळा, काकडी, लिंबू, केळीची पाने आदींना मागणी वाढू लागली. त्यामुळे बाजारात त्यांची आवक वाढली असून विविध भाज्यांचीही आवक पाहावयास मिळत आहे. गणेशोत्सव काळात काकडी, भोपळा आणि पूजेच्या साहित्याला विशेष मागणी असते. त्यामुळे बाजारात त्यांची आवक वाढली आहे. भोपळा 80 ते 120 रुपये तर काकडी 60 ते 80 रुपये किलो दराने विकली जात आहे. गणपतीसमोर पारंपरिक पद्धतीने गौरी पूजन आणि वसा पूजन केले जाते. त्यामुळे काकडी, विड्याची पाने आणि भोपळ्याला मागणी असते. त्यामुळे बाजारात आवक वाढल्याचे दिसत आहे. विविध भाज्यांनाही मागणी वाढली आहे. त्यामुळे भाजीपाला तेजीत असल्याचे दिसत आहे. त्याबरोबरच पाने, नारळ, हार, फुले, लिंबू आदींनाही पसंती दिली जात आहे. शहरासह ग्रामीण भागात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. त्यामुळे सत्यनारायण पूजा आणि इतर धार्मिक कार्यक्रम आयोजन केले जात आहे. त्यामुळे पूजा साहित्याला मागणी वाढत आहे. एरव्ही कमी प्रमाणात दिसणारी काकडी गणेशोत्सवासाठी बाजारात सर्वत्र पाहावयास मिळत आहे. होलसेल भाजी मार्केटमधून काकडीची आवक होत आहे. त्यामुळे बाजारात व इतर ठिकाणी काकडीची विक्री वाढली आहे.