दोडामार्ग – वार्ताहर
कोकणातील प्रत्येक गावाच्या प्रथा परंपरा वेगवेगळ्या आहेत. गावामध्ये प्रामुख्याने भजन परंपरा आदर्श मानली जाते आणी ती कळणे गावाने जपलेली आहे असे उद्गार जेष्ठ संगीत शिक्षक गंगाराम गोसावी यांनी कळणे येथे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवशीय भजन कार्यशाळेच्या उदघाट्न प्रसंगी काढले.
यावेळी व्यासपीठावर कळणे सरपंच अजित देसाई, लेखक ह.ल.भिसे, जिल्हा बँक संचालक गणपत देसाई, यांसह सखाराम देसाई, भजन गायक विठ्ठल शिरोडकर, उपसरपंच आत्माराम देसाई, माजी सरपंच आनंद देसाई, भजनकर्मी विश्वास देसाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
भजन कार्यशाळा गोव्यातील नामवंत भजन गायक विठ्ठल शिरॊडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालली. कार्यशाळेला अभंग रचना, गवळण, गजर इत्यादी प्रकार सादर करण्यात आहे. तबला साथ राकेश डेगवेकर, समीर शिरोडकर, हार्मोनियम वर कृष्णा देसाई, प्रदीप शिरोडकर यांनी साथसंगत केली. गायन साथ गणेश शिरोडकर , बाबुराव गवस, संतोष गवस, सचिन देसाई यांनी केली. ध्वनीसंयोजन अजिंक्य देसाई यांनी सांभाळली. एकूण 55 भजनप्रेमींनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक उमेश देसाई, तर आभार केदार भिसे यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी गिरीष नार्वेकर, शरद देसाई, वबू घोटगे, प्रभाकर देसाई , गौरेश देसाई, रवी नाईक, निलेश देसाई, सुहास देसाई देसाई यांनी मेहनत घेतली.