कृषीमंत्री रवी नाईक यांचे आवाहन : फोंड्यात कृषी बाजारचे उद्घाटन
फोंडा : स्थानिक बागायती मालाला आज चांगला दर आहे. काजूगरांना तर देश-विदेशातील बाजारात मागणी असून गोव्यातील स्थानिक बागायती फळे पर्यटन व अन्य माध्यमातून विदेशी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत. गोव्यातील जमिनी टिकवून ठेवण्यासाठी, त्या पडिक न ठेवता तेथे कृषी बागायती उत्पादन घेण्याचे आवाहन कृषिमंत्री रवी नाईक यांनी केले आहे. कृषी सेवा केंद्र फोंडा आणि आविष्कार कला केंद्र यांनी खडपाबांध-फोंडा येथे आयोजित केलेल्या शेतकरी बाजाराच्या उद्घाटन सोहळ्यात मंत्री रवी नाईक प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. स्थानिक शेतकऱ्यांच्या बागायती मालाला कायमस्वऊपी विक्री केंद्र उपलब्ध व्हावे व ग्राहकांना खरेदीची सोय व्हावी यासाठी हा शेतकरी बाजार सुरू करण्यात आला आहे. रविवारी सकाळी झालेल्या उद्घाटन सोहळ्याला अनिवासी भारतीय आयुक्त तथा गोवा बागायतदारचे अध्यक्ष अॅड. नरेंद्र सावईकर व फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक हे व्यासपीठावर उपस्थित होते.
तऊणांना शेतीविषयी आवड
कृषी खात्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या कृषी प्रशिक्षण उपक्रमांना राज्यातील युवकांचा लाभणारा प्रतिसाद पाहिल्यास, गोव्यातील तऊणांना शेतीविषयी आवड असल्याचे स्पष्ट होत असल्याचे मंत्री रवी नाईक यांनी पुढे बोलताना नमूद केले.
शेतकऱ्यांची, ग्राहकांची सोय
स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला चांगले दर व मार्केट मिळण्यासाठी शेतकरी बाजार ही चांगली संकल्पना असल्याचे अॅड. नरेंद्र सावईकर म्हणाले. या बाजारामुळे स्थानिक शेतकऱ्यांना विक्री केंद्र तर ग्राहकांना खरेदी अशी दुहेरी सोय झाली आहे.
इको फ्रेंडली गणेशमूर्ती उपलब्ध
रितेश नाईक यांनी शेतकरी बाजारात बागायती मालाबरोबरच इको फ्रेन्डली गणपती मूर्ती उपलब्ध केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. एकवेळ वापरातील प्लास्टिकवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
गणेशचतुर्थीचे साहित्य
मनोज गांवकर यांनी प्रास्ताविक भाषणात शेतकरी बाजार संकल्पनेविषयी माहिती दिली. स्थानिक शेतकऱ्यांचा बागायती माल या केंद्रात आणून ग्राहकांना उपलब्ध कऊन दिला जाणार आहे. गणेशचतुर्थी जवळ असल्याने शाडूच्या गणेशमूर्ती तसेच सण उत्सवाच्या काळात घरात सजावटीसाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य याठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. अजय सावईकर यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटन सोहळ्यानिमित्त विविध प्रकारचे बियाणे, रोपे व झाडांच्या फांद्याची देवाणघेवाण आणि विक्री करण्यात आली.