यंदाचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दिला जाणार आहे. या संबंधींची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केली आहे. वहिदा रेहमान यांनी आपल्य़ा उमेदीच्या काळात प्यासा, गाईड, रेश्मा और शेरा आणि यासारख्या असंख्य हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपल्या ट्विटरवर अकांउंटवर वहिदा रेहमान यांच्या नावाची घोषणा म्हटले आहे कि, “वहिदा रहमानजी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल यावर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. हे जाहीर करताना मला खूप आनंद आणि सन्मानाची भावना होत आहे.”
पुढे लिहिताना ते म्हणाले, “वहिदाजी यांना हिंदी चित्रपटांमधील विविध भूमिकांसाठी समीक्षकांनी प्रशंसित केले आहे. त्यांच्या प्यासा, कागज के फूल, चौधवी का चाँद, साहेब बीवी और गुलाम, मार्गदर्शक, खामोशी आणि यासह इतर अनेक चित्रपटामधील भुमिका लक्षात ठेवल्या जातील. त्यांनी आपल्या 5 दशकांहूनच्या आपल्या कारकिर्दीत अत्यंत चोखंदळपणे साकारल्या आहेत. रेश्मा आणि शेरा या चित्रपटातील कुळाच्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त, वहिदाजी यांनी समर्पण, वचनबद्धता आणि एका भारतीय नारीच्या सामर्थ्याचे उदाहरण देताना आपल्या परिश्रमाने व्यावसायिक उत्कृष्टतेची सर्वोच्च पातळी गाठली आहे.”
शेवटी लिहीताना त्यांनी ऐतिहासिक नारी शक्ती वंदन अधिनियम संसदेने संमत केला असताना, वहिदाजी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणे ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एका आघाडीच्या स्त्रीचा योग्य गौरव असल्याचे म्हटले आहे.