प्रतिनिधी / बेळगाव
काल रात्रीपासून तुफानी वाऱ्यासह सुरु असलेल्या संततधार पावसामुळे शहर परिसरात झाडे कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. कॅम्प येथे पहाटे 4 वा. 30 मिनिटांनी महेंद्र देशपांडे यांच्या घरावर मे फ्लॉवर चे झाड कोसळले. या घटनेत देशपांडे यांचे बरेच नुकसान झाले आहे.
त्याचप्रमाणे वेंगुर्ला रोडवर ही झाड कोसळले. दरम्यान माहिती मिळताच कॅन्टोन्मेंट तर्फे वेंगुर्ला रोड वरील झाड हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र या घटनेमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.