खानापूर: तालुक्यात केंद्रीय पथकाकडून पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी दौरा शनिवारी करण्यात आला, यावेळी केंद्रीय पथकातील अधिकारी जिल्हाधिकारी नीतीन पाटील, प्रांताधिकारी,करलीनगनावर तहसीलदार प्रवीण जैन, जिल्हा पंचायतीचे सीईओ यासह विविध उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते. खानापूर शहरातील चीरमुरकर गल्ली येथील अंगणवाडीची पाहणी करण्यात आली, त्यानंतर घोडे गल्ली अंगणवाडीची पाहणी करून रुमेवाडी येथील अंगणवाडीची पहानीकरण्यात आली आहे. तसेच गर्लगुंजी येथील पडझड झालेल्या शाळेची पाहणी करण्यात आली आहे अंगणवाडीतील पुरवठा करण्यात येणाऱ्या कडधान्याबद्दल केंद्रीय अधिकाऱ्यानी अंगणवाडीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आम्ही मोठ्या प्रमाणात पैसा देत आहोत मग असले सडके धान्य का असा सवाल ही थेट विचारण्यात आला यावेळी तूरडाळ, तांदूळ, मुग यासह इतर कडधान्यांच्या उत्तम प्रतीचे धान्य पुरवठा करण्यात यावा अशा अधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत. तसेच अंगणवाडी गळती बाबत भविष्यात कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत माहिती देण्यात आली आहे.
Previous Articleयंदा 27 तास गणेश विसर्जन मिरवणूक, पोलिसांनीही धरला ठेका; जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणतात..
Next Article चेहऱ्यावरील तेलकटपणा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय
Related Posts
Add A Comment