सलग दोन दिवस पडलेल्या पावसामुळे शेतकऱयांची चिंता वाढली : सोयाबीन-भातपिकाला मोठा फटकाः रस्त्यांवरही साचले पाणी
वार्ताहर /किणये
गेल्या दोन दिवसापासून तालुक्मयात सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा बळीराजा संकटात सापडला आहे. हाता तोंडाला आलेली पिके खराब होऊ लागली असल्यामुळे शेतकऱयांची चिंता वाढलेली आहे. मंगळवारीही तालुक्मयाच्या सर्रास भागात जोरदार परतीचा पाऊस
झाला.
तालुक्मयात सोमवारी व मंगळवारी परतीचा पाऊस झाला. या पावसामुळे ठीकठिकाणच्या रस्त्यांवर पाणी आले होते. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. पिरनवाडी, मच्छे आदी भागातील रस्त्यांवर पाणी आले होते. यामुळे ये-जा करणाऱया वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
मंगळवारी सकाळी व पुन्हा दुपारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेत शिवारातील पोसवून आलेले भातपीक आडवे झाले आहे. यामुळे शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. भातपिके भरून आली होती. तसेच बहुतांशी शेतातील पिकांना भाताची लोंबे आली होती. तालुक्मयातील शेतकऱयांचे भात हे मुख्य पीक आहे आणि या पिकाचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱयांना अधिक फटका बसला आहे.
तालुक्मयाच्या देसूर, राजहंसगड, नंदीहळी, नागेनहट्टी, बस्तवाड, हलगा, तारीहाळ आदी परिसरात सोयाबीनचे पीक अधिक घेण्यात आलेले आहे. येत्या काही दिवसातच या पिकाची काढणी शेतकरी करणार होते. मात्र पीक बहरून आलेल्या ऐन कालावधीतच परतीचा पाऊस आल्यामुळे सोयाबीनचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
हा पाऊस नाचणा व ऊस पिकासाठी पोषक ठरला आहे. पश्चिम भागातील बेळगुंदी, सोनोली, येळेबैल परिसरात नाचणा पीक मोठय़ा प्रमाणात घेण्यात आले आहे. या पिकाला नाचण्याची कणसे भरून येऊ लागली आहेत. या पिकासाठी हा पाऊस पोषक ठरणार असल्याची माहिती शेतकऱयांनी दिली आहे.
सोमवारी तालुक्मयाच्या काही भागात परतीचा पाऊस झाला तर काही परिसरात किरकोळ पावसाचा शिडकावा झाला. मात्र मंगळवारी सकाळी तालुक्मयाच्या सर्रास भागात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे हवामानात कमालीचा बदल झालेला दिसून येत आहे. थंडीच्या प्रमाणातही वाढ झालेली आहे.