प्रतिनिधी /पर्वरी
पर्वरी येथील दामनिया जवळील वळणावर गुरुवारी रात्री कंटेनर उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कंटेनरसह दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातमुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली.
अशोक लेलॅन्ड कंटेनर श्प् 43 X 4359 पणजीहून म्हापशाच्या दिशेने जात असताना येथील दामानिया जवळील वळणावर कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जाहिरातीसाठी रस्त्याच्या बाजूला पार्क करून ठेवलेली रीक्षा जीए 03 के 1472 वर उलटली. या झालेल्या अपघातात रिक्षाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. हवालदार प्रीतम दाभोळकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास करीत आहे.