नवी दिल्ली
ः आक्षेपार्ह वक्तव्य आणि वादग्रस्त विधानांमुळे भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नवीन जिंदाल यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या ते दिल्लीत असले तरी त्यांच्या कुटुंबाने दिल्ली सोडली आहे. जिंदाल आणि त्याच्या कुटुंबीयांना अनेक दिवसांपासून सतत जीवे मारण्याच्या धमक्मया दिल्या जात आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नवीन जिंदाल हे वादाच्या भोवऱयात अडकले होते. वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपने 5 जून रोजी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. तसेच आता जीवाला धोका असल्याचे विचारात घेऊन त्यांना अतिरिक्त सुरक्षा पुरविण्यात आली आहे.