वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील लिव्हरपूल एफसी क्लबने मंगळवारी उरुग्वेचा आघाडी फळीतील आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू डार्विन न्यूनेझशी नवा करार केला आहे. न्यूनेझ यापूर्वी बेन्फिका क्लबचे प्रतिनिधित्व करीत होता.
उरुग्वेच्या न्यूनेझबरोबर लिव्हरपूल एफसी संघाने दीर्घ मुदतीचा करार करताना 85 दशलक्ष पौंड्सची रक्कम मोजली. न्यूनेझ यापूर्वी दोन फुटबॉल हंगामामध्ये पोर्तुगाल येथे बेन्फिका क्लबकडून खेळत होता. 22 वषीय न्यूनेझने आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत उरुग्वेच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून 11 सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. 2019 ऑक्टोबरमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. लिव्हरपूल क्लबकडून खेळताना न्यूनेझ 27 क्रमांकाची जर्सी वापरणार आहे. यापूर्वी लिव्हरपूल एफसी क्लबने लुईस सुआरेझ आणि सेबेस्टियन कोट्स यांच्याशी करार केला होता.