समीर शेख यांना आव्हान, मोक्कातून सुटताच जीवघेणा हल्ला
प्रतिनिधी/ गोडोली
दोन मा†हन्यांपूर्वी मोक्का कायद्याच्या कचाट्यातून जामिनावर सुटल्यापासून ललन जाधवने पुन्हा दहशत ा†नर्माण करायला सुऊवात केली आहे. लल्लन व त्याच्या साथीदारांनी शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संगमनगर येथील भंगार व्यावसायिक पैलवान विक्रम वाघमारे (वय 39, रा. संगमनगर सातारा) यांच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात ते जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी तत्काळ खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. लल्लनच्या दहशतीमुळे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यापुढे आव्हान उभे राहिले आहे.
पैलवान विक्रम वाघमारे यांच्यावर हल्ला करणाऱ्या लल्लन जाधव याच्यासह यल्लापा शरणप्पा कुरमन, छोट्या उर्फ डोगुंल्या कांबळे, ऋषीकेश कांबळे, अजय खवळे, ऋत्विक नाईकनवरे, धनजंय बडेकर, रोहित वाघमारे (सर्व. रा. प्रतापसिंहनगर सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच हे सर्व गायब झाले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पैलवान विक्रम वाघमारे यांचा संगमनगर येथे भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. यावेळी दत्ता जाधव व लल्लन जाधव या पिता-पुत्रांशी त्यांचा वाद झाला होता. सन 2012 मध्ये या दत्ता जाधव याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. ही कारवाई विक्रम वाघमारे यांच्यामुळे झाली. त्याने पोलिसांना माहिती दिली, असा संशय लल्लन जाधव वारंवार घेत आहे. लल्लन याने काही दिवसापुर्वी विक्रम याला प्रतापसिंहनगर येथे बोलवून घेतले. व वडिलांना तुरूंगात पैसे पाहिजेत, पाच लाख रूपये दे म्हणत दमदाटी केली. हे पैसे देण्यास त्यांनी नकार दिल्याने जबरदस्ती त्यांच्या खिशातून 1 हजार 300 रूपये काढून घेतले. परत काही दिवसांनी त्यांना बोलवून घेतले. पैशाची मागणी करत 4 हजार 500 रूपये काढून घेतले. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता विक्रम हे भंगाराचे दुकान बंद करून घरी जात होते. यावेळी लल्लन जाधव व त्याचे सात साथीदार तिथे आले. त्यांनी पैलवान विक्रम वाघमारे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. कोयत्याचे वार पैलवान विक्रम यांनी हातावर झेलत आरडाओरडा केला. यामुळे परिसरातील लोकांना या घटनेची माहिती झाली. तोच या सगळ्यांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विक्रम यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. आणि लल्लन जाधव याच्यासह सात जणांवर तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.