बाप आणि बेटीचे (मुली) नाते खूप गोड असते… बापच आपल्या मुलीच्या मागण्या कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी सोशल मीडियावर अशी एक घटना समोर आली आहे, ज्यामुळे काही लोकांच्या चेहऱ्यावर हसू पसरले आहे, तर मोठ्या संख्येने लोक आश्चर्यचकित झाले आहेत. वडिलांचा हा लुक चित्र-विचित्र वाटत असला तरी मल्टिप्लेक्समध्ये त्यांना प्रत्यक्ष पाहिलेल्या सिनेरसिकांनी त्यांना ‘रिअल डिअर पापा’ अशी उपाधी देऊन टाकली. तसेच सध्या सोशल मीडियावरही त्यांच्या या ‘गुलाबी’ लुकची जोरदार चर्चा होत आहे. खरं तर, एका मुलीने आपल्या वडिलांना बार्बी चित्रपट पाहण्यासाठी गुलाबी रंगाचा डेस घालून येण्याचे आव्हान दिले.
मुलीच्या या आग्रहापुढे सुरुवातीला नकार देणाऱ्या तिच्या वडिलांना मुलीचा हट्ट पुरवावाच लागला. तिच्या वडिलांनी स्विकारलेल्या या चॅलेंजची चित्रपटगृहात बरीच चर्चा झाली. काही रसिकांनी तर अक्षरश: त्या ‘बार्बीमय’ गुलाबी कुटुंबासोबत सेल्फीही काढले. वडिलांनी केवळ आपल्या मुलीचे आव्हान स्वीकारले नाही तर चित्रपट पाहण्यासाठी तिच्यासोबत गुलाबी स्कर्ट आणि टॉप घालून मल्टिप्लेक्समध्ये गेले. या फोटोंची मालिका फेसबुकवर शेअर करण्यात आली असून त्यामध्ये वडील फक्त गुलाबी रंगाचा स्कर्ट, टॉप आणि टोपीमध्ये दिसत आहेत. एलिजार रॉड्रिग्ज हर्नांडेज नावाच्या युजरने ही पोस्ट शेअर केली आहे. यानिमित्ताने नुएवो लारेडो येथील बाप-बेटीची जोडी खूप हिट झाली आहे. मी माझ्या लहान मुलीवर माझे अपार प्रेम दाखवले. मुलीसोबत बार्बी चित्रपट पाहताना खूप आनंद आणि अभिमान वाटला, अशी कबुली वडिलांनी दिली आहे. बार्बी चित्रपटाच्या जगभरात रिलीज होण्याच्या एक दिवस आधी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्यापासून लोक बाप-बेटीची जोरदार प्रशंसा करत आहेत.