आंदोलनकर्ते, पार्किंग, रिक्षास्टॅंडसाठी लवकरच आराखडा तयार, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
प्रतिनिधी / बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पार्किंगची समस्या गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे नूतन जिहाधिकाऱ्यांनी याबाबत गंभीर दखल घेतली आहे. स्मार्टसिटीच्या अभियंत्यांना बोलावून परिसराची पाहणी केली. याचबरोबर काही सूचना केल्या आहेत. एकूणच जिल्हाधिकार्यालयाचा लूक बदलणार असल्याचे दिसून येत आहे.
आंदोलनकर्ते भर पाऊस, उन्हात थांबून आंदोलन करत आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था करणे गरजेचे आहे. याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. याचबरोबर रिक्षा स्टॅन्डही उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. मात्र २ ते ३ दिवस थांबा त्यांनतर तुम्हाला नवीन लूकबाबत ब्लूप्रिंट देऊ असे सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत स्मार्टसिटीचे अधिकारी प्रवीण बागेवाडी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.