वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
येथे 25 सप्टेंबरपासून टी-20 राष्ट्रीय बधिरांची क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 19 संघांचा समावेश राहिल. सदर स्पर्धा सात दिवस चालणार असल्याची माहिती अखिल भारतीय बधिरांच्या क्रिकेट संघटनेतर्फे देण्यात आली.
सहभागी होणारे संघ चार विविध गटात विभागण्यात येणार असून एकूण 42 सामने खेळवले जाणार आहेत. ओदिशा बधिर क्रिकेट संघटनेने या स्पर्धेचे यजमानपद भूषविले आहे. स्पर्धेतील अंतिम सामना 1 ऑक्टोबरला होईल. स्पर्धेतील विजेत्या संघाला 1 लाख रुपये तर उपविजेत्याला 50 हजार रुपये त्याचप्रमाणे इतर वैयक्तिक रोखरकमेची बक्षीसे देण्यात येतील. प्रत्येक सामन्यातील सामनावीराला 2100 रुपयांचे बक्षीस दिले जाईल.