जमीनमालक शेख यांच्यावर गुन्हा : वनखात्याचे कोंबिग ऑपरेशन सुरु
प्रतिनिधी/वाळपई
गेल्या काही वर्षापासून सत्तरी तालुक्मयाच्या ग्रामीण भागामध्ये जंगली जनावरांची शिकार करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. बंदूक वापरण्या विरोधात कडक निर्बंध लावण्यात आल्यानंतर सापळे रचून रानटी जनावरांची शिकार होऊ लागलेली आहे. अशाच प्रकारे रानटी जनावरांची शिकार करण्यासाठी रचलेल्या सापळय़ांमध्ये बिबटय़ा वाघाचा दुर्दैवी मृत्यू होण्याचा प्रकार घडला आहे. कोपर्डे याठिकाणी गावात जाणाऱया रस्त्याच्या अगदी बाजूलाच बिबटय़ा या सापळय़ामध्ये अडकला व त्याचा मृत्यू झाला.
सदर प्रकारामुळे वनखात्याच्या यंत्रणेमध्ये सतर्कता निर्माण झाली असून गावात आज तातडीने कोंबिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले.
तारांच्या सापळय़ात अडकला बिबटय़ा
कोपर्डे या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या रस्त्याच्या बाजूला रानटी डुकरांची शिकार करण्यासाठी तारांचा सापळा रचला होता. या सापळय़ामध्ये गुरुवारी मध्यरात्री बिबटय़ा अडकण्याचा प्रकार घडला. बिबटय़ा सापळय़ामध्ये अडकल्यामुळे गुदमरून त्याचा मृत्यू होण्याचा प्रकार घडला. शुक्रवारी सकाळी काही नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर या संदर्भाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले व एकाच खळबळ निर्माण झाली. सदर घटनेची बातमी वाऱयासारखी पसरताच सदर भागांमध्ये नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली.
याबाबतची माहिती वनखात्याच्या वाळपई विभागाला मिळाल्यानंतर वनाधिकारी श्यामसुंदर गावस, सहाय्यक वनाधिकारी महादेव गावकर व इतरांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन सापळय़ामध्ये अडकलेला बिबटय़ाला बाहेर काढला. घटनेचा पंचनामा करून मृत अवस्थेत बिबटय़ाला वाळपई वनाविश्रामधामाच्या परिसरामध्ये नेण्यात आले. तेथे पशुवैद्यकीय अधिकारी गायत्रीदास गावठणकर यांनी उत्तररीय तपासणी केल्यानंतर खड्डा खोदून अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याना वासुदेव धुरी यांनी सहकार्य केले.
बिबटय़ा सापळय़ात अडकणे दुर्दैवी : चोडणकर
सहाय्यक उपवनपाल विश्वास चोडणकर यांनी सांगितले की कोपर्डे या ठिकाणी सापळय़ामध्ये अडकून बिबटय़ाचा मृत्यू झाला. हा प्रकार मध्यरात्री किंवा शुक्रवारी पहाटे घडण्याची शक्मयता आहे. सापळय़ात अडकल्यानंतर त्याचा गुदमरून मृत्यू झाला. खात्याने ही बाब गंभीरतेने घेतली असून सदर भागांमध्ये कोंबिंग ऑपरेशन हाती घेण्यात आलेले आहे. ज्या ठिकाणी सापळे घालण्यात आलेले आहेत ते उद्ध्वस्त करण्याचे निर्देश कर्मचाऱयांना देण्यात आलेले आहेत. सापळे सापडणाऱया जमीन मालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
मृतावस्थेत सापडलेला बिबटय़ा पूर्ण वाढ झालेला होता. जवळपास एक मीटर उंचीचा हा बिबटय़ा अत्यंत चपळ होता.
शेख सायराबानू तालब यांच्यावर गुन्हा
ज्याठिकाणी हा सापळा लावण्यात आला होता, सदर जमीन शेख सायराबानू तालब यांच्या मालकीची आहे. यामुळे सदर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आdहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांच्या मुलांना ताब्यात घेण्यात आले असून या संदर्भात अधिक चौकशी सुरू आहे.
संशयितावर कडक कारवाई करा : वनमंत्री
दरम्यान पत्रकारांशी बोलताना वनमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की कोपर्डे या ठिकाणी दुर्दैवी अवस्थेत बिबटय़ाचा मृत्यू हा गंभीर प्रकार आहे. यामध्ये गुंतलेल्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसे निर्देश आपण वनखात्याच्या अधिकाऱयांना दिलेले आहेत. यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारची गय होणार नाही असे त्यांनी सांगितले.
रानटी जनावरे लोकवस्तीच्या दिशेने का येतात?
हल्लीच्या काळामध्ये रानटी जनावरे लोकवस्तीच्या दिशेने येण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. रानामध्ये त्यांना भक्ष्य सापडत नसल्यामुळे ते भक्ष्याच्या शोधात लोकवस्तीच्या नजीक येतात. यामुळे गावात असलेली कुत्रे, मांजरे, पाडसे यांना लक्ष्य करतात. कोपर्डे या ठिकाणी सापळय़ामध्ये अडकलेला बिबटा सभोवताली भागामध्ये अनेकांच्या नजरेस पडत होता. या भागातील अनेक कुत्र्यांना त्याने भक्ष्य केले होते.
दरम्यान वनमंत्री विश्वजीत राणे यांनी सदर घटना गंभीरतेने घेतली असून संशयीतावर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला असून त्या संदर्भाची निर्देश खात्याला दिलेले आहेत. दरम्यान ज्याठिकाणी हा प्रकार घडला सदर जमीन मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.