मालवण/प्रतिनिधी
तारकर्लीत नव्या पिढीतील समतोल साधणारे हिंदबाळ भगवान केळुसकर, माजी सैनिक (आर्मी) यांचे दिनांक १५.७.२०२३ रोजी दुपारी १ वाजता गोवा येथे रुग्णालयात वयाच्या ६९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. कै. हिंदबाळ यांचे शिक्षण जुनी ११ वी (मॅट्रीक) पर्यंत . १९८० च्या बॅच (कोल्हापुर) मधून सैन्य दलात सैनिक म्हणून निवड.सैन्य दलाचे खडतर प्रशिक्षण संपताच पंजाब बॉर्डरला सिग्नल यंत्रणेवर प्रथमच पोस्टिंग झाली.तारुण्या पासून मृत्यू पर्यंत पंजाबी लोकां सारखी सुद्दढ शरीर यष्ठीलाभलेला व टिकविलेली असामी असायची.दर वर्षी न चुकता सुट्टीवर तारकर्ली गावी यायचे सेवानिवृत्ती नंतर रापणीच्या होडीवर जाण्यास ते नेहमी आघाडीवर असायचे.अजूनही स्वतःचा मासेमारी व्यवसाय मुलासोबत करत होते. तसेच सेवानिवृत्ती नंतर सिंधुदूर्ग माजी सैनिक पत संस्थेचे संचालक होऊन यावर्षी ‘उपाध्यक्ष’ होते.तसेच सिंधुदुर्ग श्रमजिवी रापण असोसिएशनचे सदस्यही होते.सतत जमीनीवर पाय असलेलं असं व्यक्तिमत्त्व, आज आपल्याला अचानक कायमचं सोडून गेलं. ही खंत आणि हळहळ पंचक्रोशीत होत आहे.त्यांच्यावर तारकर्ली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार वेळी ग्रामस्थ,नातेवाईक,मित्रमंडळी असे असंख्य जनसमूह उपस्थित होता.त्यांच्या पश्चात पत्नी,विवाहित मुलगा हरेश ,सून विवाहित मुलगी नातवंडं आणि पुतणे असा परिवार आहे.
Previous Articleनगरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # content writer # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg
Related Posts
Add A Comment