जवळपास 45 टक्क्यांपर्यंत घसरण : अहवालामधून माहिती सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2021-22 आणि 2022-23 या आर्थिक वर्षांमध्ये भारतीय कृषी तंत्रज्ञानावर आधारित स्टार्टअप्समधील गुंतवणुकीत 45 टक्के घट झाली आहे. वाढत्या जागतिक व्याजदर आणि वाढती अनिश्चितता यामध्ये गुंतवणूकदारांनी अधिक सावध राहण्याचे हे याचे मुख्य कारण मानले जात आहे.
जागतिक स्तरावर कृषी-तंत्रज्ञान गुंतवणुकीत 10 टक्के घट
सल्लागार फर्म एफएसजीच्या अहवालानुसार, 2022 ते 2023 दरम्यान जागतिक कृषी-तंत्रज्ञान गुंतवणुकीत 10 टक्क्यांनी घट झाली आहे. एफएसजीची अपेक्षा आहे की आर्थिक वर्ष 2024 मध्येही गुंतवणूक अपेक्षेsपेक्षा कमी होईल. आर्थिक वर्ष 2025 मध्ये त्यात वाढ होण्याची शक्यता आहे, असे सांगितले जात आहे.
बिझनेस मॉडेल सुधारण्याची गरज
अहवालानुसार, ‘गुंतवणूकदार जागृत राहात प्रस्थापित बिझनेस मॉडेल्समध्ये मर्यादित निधी गुंतवतील. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ऋषी अग्रवाल म्हणाले, सध्या भारतीय कृषी-तंत्रज्ञान क्षेत्राची संवेदनशीलता अधोरेखित होत आहे. स्टार्टअप्सनी या संथ गुंतवणुकीचा कालावधी त्यांच्या व्यवसायाचे मॉडेल सुधारण्यासाठी वापरला पाहिजे.’