वृत्तसंस्था/ डोहा
भारताच्या 17 वर्षाखालील वयोगटाच्या पुरुषांच्या फुटबॉल संघाला कतार विरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. डोहा येथील ऍस्पिरे अकादमीच्या मैदानावर भारत आणि कतार यांच्यात दोन मित्रत्वाचे सामने आयोजित केले आहेत.
शनिवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात कतारने भारताचा 3-1 अशा गोल फरकाने पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीला इथान दिफीनाने कतारचे खाते उघडले. त्यानंतर शेषावत पनवारने गोल नोंदवून भारताला बरोबरी साधूत दिली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. खेळाच्या उत्तरार्धात कतार संघाकडून खलिद अलसाहिबी आणि मोहम्मद ईलसिद्दीग यांनी प्रत्येकी 1 गोल करत भारताचे आव्हान संपुष्टान आणले.