इजिप्तच्या संरक्षणमंत्र्यांसोबत विस्तृत चर्चा
वृत्तसंस्था/ कैरो
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे सध्या इजिप्तच्या तीन दिवसीय दौऱयावर आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी कैरोमध्ये इजिप्तचे संरक्षण मंत्री जनरल मोहम्मद जकी यांच्याशी चर्चा केली आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान द्विपक्षीय संरक्षण संबंध वृद्धींगत करण्यासाठी अनेक पैलूंवर व्यापक चर्चा झाली आहे.
राजनाथ सिंह यांनी संरक्षण सहकार्य संबंधीच्या एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी देखील केले. या करारामुळे भारत आणि इजिप्तचे संबंध बळकट होण्यासह दोन्ही देशांमधील संबंधांना नवी गती तसेच ताळमेळही प्राप्त होणार असल्याचे राजनाथ यांनी म्हटले आहे.
इजिप्त हा आफ्रिकेतील भारताचा सर्वात महत्त्वपूर्ण व्यापारी भागीदार आहे. दोही देशांच्या व्यापारात मोठी वाढ झाली असल्याचे राजनाथ सिंह यांनी नमूद पेले आहे. राजनाथ सिंह यांनी सोमवारी कैरोमध्ये इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फत्ताह अल-सीसी यांची भेट घेतली होती. राजनाथ सिंह आणि सीसी यांनी सैन्य सहकार्य वाढविण्यासह संयुक्त प्रशिक्षण संरक्षण सह-उत्पादनावर सहमती दर्शविली होती. भारताने इजिप्तमध्ये 3.15 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. अनेक भारतीय कंपन्यांचे प्रकल्प इजिप्तमध्ये सुरू आहेत.