मुंबई
डेल्टा कॉर्प या कंपनीचे समभाग सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात घसरताना दिसले आहेत. सोमवारी एनएसईवर कंपनीचे समभाग 15 टक्के इतके घसरत 149 रुपयांवर खाली आले होते. अशा प्रकारे समभाग 52 आठवड्याच्या नीचांकी स्तरावर कार्यरत राहिला होता. कर भरण्यासंबंधीची कर विभागाची नोटीस कंपनीला आल्याने याचा परिणाम समभागावर सोमवारी मोठ्या प्रमाणात दिसून आला.