बैलहोंगल प्रांताधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
बैलहोंगल येथील तबस्सुम इर्शाद सौंदत्ती (वय 20) या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्याची मागणी बैलहोंगल येथील नागरिकांनी केली. यासंबंधी बैलहोंगल प्रांताधिकाऱयांना निवेदनही देण्यात आले.
12 ऑक्टोबर रोजी सकाळी तिला अत्यवस्थ अवस्थेत तिच्या मित्राने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याच दिवशी सायंकाळी व्यवसायाने रिक्षाचालक असलेल्या वडिलांनी तबस्सुमला उपचारासाठी खासगी इस्पितळात हलविले. दुसऱया दिवशी तिचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणावरून बेळगावसह राज्यात महिलांची सुरक्षा धोक्मयात आली आहे. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडली आहे, हे लक्षात येते. त्यामुळे सरकारने त्वरित हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी मुस्लीम समाजातील प्रमुखांनी केली आहे. निजद जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी, मुस्लीम समाजातील प्रमुख व महिलांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून मागणी केली.