म. ए. समिती युवा आघाडीतर्फे बेळवट्टी ग्रा. पं. ला निवेदन
वार्ताहर /किणये
ग्रामपंचायतीतून मिळणारी सर्व कागदपत्रे मराठीतून द्या, अशा मागणीचे निवेदन बेळवट्टी ग्रामपंचायतीला सोमवारी दिले. बेळवट्टी, इनाम बडस, बाकनूर, धामणे एस. आदी गावातील ग्रामस्थ, तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीतर्फे हे निवेदन देण्यात आले.
भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार सीमाभागातील मराठी भाषिकांना सरकारी कार्यालयातून परिपत्रके मराठीतून मिळायला हवीत. मात्र राज्य सरकारच्या दबावाखाली सरकारी कार्यालयांमधून मराठी परिपत्रके जाणीवपूर्वक मराठी भाषिक बांधवांना देण्यात येत नाहीत. यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मार्गदर्शनानुसार बेळगाव तालुक्मयातील महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडी व त्या त्या भागातील मराठी भाषिकांच्यावतीने प्रत्येक ग्रामपंचायतीला मराठीतून परिपत्रके देण्यासाठी निवेदन देण्याची मोहीम सुरू केली आहे.
यापूर्वी बेनकनहळळी, हिंडलगा ग्रामपंचायतींना मराठी परिपत्रके देण्यासाठी निवेदने दिलेली आहेत. सोमवारी सकाळी बेळवट्टी ग्रामपंचायत भागातील नागरिकांतर्फे निवेदन देण्यात आले आहे. निवेदन पीडिओ श्रीदेवी हिरेमठ, ग्रामपंचायत अध्यक्ष माळू मजुकर, उपाध्यक्षा महादेवी मेदार यांच्याकडे सदस्य व परिसरातील पंचमंडळी व समितीच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे. या भागात मराठी बहुभाषिक अधिक आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीमधून मिळणारी सर्व कागदपत्रे मराठीतून द्यावीत. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी सोयीस्कर ठरणार आहे. मातृभाषेतून परिपत्रके मिळाल्यास कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, अशी माहितीही उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी पीडीओ यांना दिली. त्यामुळे ग्रामपंचायतीतर्फे वरि÷ अधिकाऱयांना या निवेदनाची दखल घेण्यासंदर्भात कळवावे, असेही सांगितले.
निवेदन देताना म. ए. समिती युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, बाबाजी देसूरकर, चेतन पाटील यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य विठ्ठल पाटील, धाकलू पाटील, मधु नलवडे, रेश्मा कुलम, रेणुका सुतार, अनुप्रिया कांबळे, निशा चांदीलकर, बाबुराव पाटील, रुपा सुतार आदींसह एन. के. नलवडे, विठ्ठल मजुकर, नाना मजुकर, भुजंग गाडेकर, सातेरी पाटील, सातेरी चौगुले, गुंडू शिंदे, मोहन पाटील आदींसह पंचायत कार्यक्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.