सर्वोच्च न्यायालयाचा याचिकेवर सुनावणीस नकार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तंबाखूच्या तुलनेत मद्य अधिक हानिकारत असल्याचे म्हणत मद्याच्या बाटलीवर आरोग्य विषयक इशारा नमूद करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयाने धोरण निर्मितीत हस्तक्षेप करणार नसल्याचे म्हणत याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे
तंबाखू उत्पादनांवर आरोग्य विषयक इशारा असतो, अशाचप्रकारे मद्याच्या बाटल्यांवर देखील इशारा नमूद करण्याचा निर्देश सरकारला देण्याची मागणी याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका सरन्यायाधीश यू.यू. लळीत आणि न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी आणि एस. रविंद्र भट यांच्या खंडपीठासमोर विचाराधीन होती. अशाप्रकारचे विष्घ्य सरकारच्या धोरण निर्मिती विभागाच्या अंतर्गत येत असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.
सिगारेटच्या तुलनेत मद्य दहापट अधिक नुकसानकारक आहे. सिगारेटच्या पाकिटावर आरोग्य इशारा न्यायालयाच्या आदेशावरच अनिवार्य करण्यात आला होता. अशाच प्रकारे मद्याच्या बाटलीवरही इशारा असावा अशी मागणी याचिकाकर्ते अश्विनी उपाध्याय यांनी केली होती.