सफाई कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत या ठिकाणी गेले अनेक वर्षे आम्ही सफाई कर्मचारी म्हणून काम करत आहे. मात्र आम्हाला नोकरीत कायमस्वरुपी सामावून घेण्यात आले नाही. त्यामुळे आमची अवस्था दयनीय झाली आहे. तेव्हा तातडीने कायमस्वरुपी नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
महापालिका, नगरपालिकामध्ये आम्ही स्वच्छतेचे काम करत आहे. यामध्ये वाहनचालक, सफाई कर्मचारी यासह इतर कर्मचाऱयांचा समावेश आहे. 2017-18 मध्ये आम्हाला कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेऊ, असे सरकारने आश्वासन दिले होते. मात्र या घटनेला पाच वर्षे उलटली तरी अजूनही कायमस्वरुपी कर्मचारी म्हणून सामावून घेण्यात आले नाही. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे.
तातडीने नोकरीत कायमस्वरुपी सामावून घ्यावे, अन्यथा काम बंद करू, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विजय निरगट्टी, षण्मुख अदिंद्र, मेलती सक्सेना, राममोहन शेख यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.