प्रतिनिधी /बेळगाव
जगद्गुरु बसवेश्वर सर्कल खासबाग येथील नाला अत्यंत जुना आहे. हा नाला धोकादायक बनला आहे. या नाल्याची पुनर्बांधणी होणे महत्त्वाचे आहे. त्या नाल्यामध्ये सफाई करताना अनेक अडचणी येत आहेत. तेंव्हा तातडीने या नाल्याची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी नगरसेवक रवी साळुंके यांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या नाल्याला लागून अनेक घरे आहेत. हा नाला जुना झाल्यामुळे तेथील घरांना धोका निर्माण झाला आहे. तेंव्हा मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने या नाल्याची दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे. तेंव्हा याबाबत पाऊल उचलावे, अशी मागणी रवी साळुंके यांनी केली आहे. सदर नाला बळ्ळारी नाल्याला जोडला गेला आहे. मात्र हा नाला काही ठिकाणी कोसळत आहे. त्यामुळे लोखंड देखील बाहेर आले आहे. तेंव्हा याची पाहणी करा आणि तातडीने हा नाला बांधण्यासाठी पाऊल उचला, अशी मागणी करण्यात आली.
सफाई कर्मचाऱयांना त्या गटारीमध्ये कचरा साफ करण्यासाठी उतरणे देखील अवघड जात आहे. तेंव्हा नाल्याची पुनर्बांधणी करावी. जेणेकरून पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होईल, असेही या निवेदनात म्हटले आहे.