बेळगाव : बेळगाव, कलबुर्गीसह उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यांमधील पाणीटंचाई लक्षात घेऊन कृष्णा व भीमा नदीत 5 टीएमसी पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकने महाराष्ट्राकडे केली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुधवारी पत्र पाठविले आहे. बुधवारी सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले असून पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी कृष्णा व भीमा नदीला प्रत्येकी 3 टीएमसी पाणी सोडण्यासंदर्भात यापूर्वी पत्र पाठविण्यात आले होते. महाराष्ट्राने या पत्राला प्रतिसाद देत मे च्या पहिल्या पंधरवड्यात कृष्णा नदीला 1 टीएमसी पाणी सोडले होते. मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी महाराष्ट्राचे आभार मानले असून उत्तर कर्नाटकात कडाक्याच्या उन्हामुळे पाणीसमस्या तीव्र झाली आहे. त्यामुळे आणखी 5 टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. उत्तर कर्नाटकातील नागरिक व जनावरांचे पाण्याअभावी होणारे हाल थांबविण्यासाठी महाराष्ट्राने वारणा व कोयना धरणातून कृष्णा नदीला पाणी सोडण्याची मागणीही करण्यात आली आहे. उजनी धरणातून भीमा नदीला पाणी सोडावे. जूनमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आणखी 5 टीएमसी पाणी सोडावे. महाराष्ट्राने कृष्णा व भीमा नदीत पाणी सोडले तरच पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करता येणार आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकातील बेळगावसह वेगवेगळ्या जिल्ह्यांची पाणीसमस्या लक्षात घेऊन पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राकडे केली आहे.

The President, Shri Pranab Mukherjee gracing the function to commemorate the serving of 2 billion meals of the Akshaya Patra Foundation, at Bangalore, in Karnataka on August 27, 2016.
The Governor of Karnataka, Shri Vajubhai Rudabhai Vala, the Chief Minister of Karnataka, Shri Siddaramaiah and the Union Minister for Human Resource Development, Shri Prakash Javadekar are also seen.
Add A Comment