स्वत:ला श्रेय देणे शिका
फेसबुकच्या माजी सीओओ शेरिल सँडबर्ग या हार्वर्ड विद्यापीठात शिकात असताना त्यांना परीक्षा दिल्यावर आपल्याला कमी गुण पडतील अशी भीती वाटायची, परंतु प्रत्यत्रात शेरिलना नेहमीच चांगले गुण मिळायचे. मग हे गुण आपल्या हुशारीमुळे नव्हे तर नशीबाने मिळाल्याचा विचार त्या करायच्या. त्यांनी स्वत:च्या वर्तनाचे विश्लेषण केले असता आपण इम्पोस्टर सिंड्रोमने ग्रस्त असल्याचे त्यांना आढळून आले. ही एक प्रकारची मनावैज्ञानिक स्थिती असते ज्यात व्यक्ती स्वत:च्या उत्तम कामगिरीनंतरही स्वत:च्या क्षमतांवर संशय व्यक्त करतो आणि सहकाऱ्यांसाब्sात स्वत:ची तुलना करू लागतो. शेरिल यांच्यासह जगातील अनेक महनीय व्यक्ती या सिंड्रोमच्या शिकार ठरल्या आहे.
स्टारबक्सचे माजी सीईओ हॉवर्ड शूल्ज देखील या आजाराने पीडित होते. आपण सीईओ पदासाठी पात्र नसल्याचे त्यांना सतत वाटायचे. प्रत्यक्षात त्यांनी सीईओ म्हणून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. याचबरोबर अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनीही इम्पोस्टर सिंड्रोमला सामोरे गेल्याची कबुली दिली आहे. परंतु त्यांनी स्वत:च्या कमजोरीऐवजी स्वत:च्या सामर्थ्यावर लक्ष देत आत्मविश्वास मिळविला होता.
सेल्फ एस्टीम घटतो
सद्यकाळात सेलिब्रिटीपासून सर्वसामान्यांपर्यंत याचा प्रभाव दिसतो. या सिंड्रोममध्ये कामात यशस्वी ठरूनही लोक स्वत:ला यशस्वी मानत नाहीत, यामुळे त्यांचा सेल्फ एस्टीम घटतो आणि तो अपयशी ठरू लागतात. छोट्याशा चुकीवर ते अधिक लक्ष केंद्रीत करतात, यातून त्यांना एंक्झाइटी आणि बर्नआउट यासारख्या समस्या होऊ लागतात. अशा स्थितीत योग्यवेळी समस्या जाणून घेत उपाय करणे आवश्यक आहे.
स्वत:च्या यशावर अधिकाधिक बोला
स्वत:च्या कामगिरीसाठी स्वत:ला श्रेय देणे सुरू करण्याचा सल्ला तज्ञ देतात. शेरिल सँडबर्ग यांच्यानुसार स्वत:च्या यशाबद्दल इतरांच्या यशासंबंधी आपण जसे बोलतो तसे बोलावे. यामुळे गमावलेला आत्मविश्वास परत मिळविता येतो. ग्रोथ माइंडसेट देखील निवडावा. आव्हानांना टाळण्याऐवजी त्यांना सामोरे जावे आणि चुका झाल्यास घाबरून जाऊ नये. तसेच सपोर्ट सिस्टीम ठरेल असा मार्गदर्शक निवडावा असा सल्ला मनोवैज्ञानिक देतात.