आठवीच्या विद्यार्थ्याने जिंकला 50 हजार डॉलर्सचा पुरस्कार
वृत्तसंस्था/ .न्यूयॉर्क
अमेरिकेच्या फ्लोरिडाचा रहिवासी असलेला 14 वर्षीय भारतीय वंशाचा मुलगा देव शाह याने प्रतिष्ठित स्क्रिप्स 95 व्या नॅशनल स्पेलिंग बी चॅम्पियनशिप 2023 जिंकली आहे. इयत्ता आठवीचा विद्यार्थी असणाऱ्या देव शाहने ‘सॅममोफाइल’ या शब्दाचे योग्य स्पेलिंग सांगत 50 हजार डॉलर्सचा पुरस्कार स्वत:च्या नावावर केला आहे. या स्पर्धेत व्हर्जिनियातील 14 वर्षीय चार्लोट वॉल्श दुसऱ्या स्थानावर राहिली.
चार वर्षांपासून या स्पर्धेची तयारी करत होतो असे देव शाहने म्हटले आहे. स्पेलिंग स्पर्धेत 11 दशलक्ष जण सामील झाले होते, यातील 11 विद्यार्थ्यांनी अंतिम टप्प्यात स्थान मिळविले होते. या 11 पैकी 10 विद्यार्थी हे भारतीय वंशाचे हेते. अंतिम टप्प्प्यात देव शाहला 14 वर्षीय चार्लोटच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. श्रद्धाद रचमरे•ाr आणि सूर्या कापू हे 15 हजार डॉलर्सच्या पुरस्कारासोबत संयुक्त स्वरुपात तिसऱ्या स्थानावर राहिले. या स्पर्धेत शब्दाची उत्पत्ति अन् त्याच्या वापराच्या ज्ञानाचेही परीक्षण केले जाते.