ओटवणे प्रतिनिधी
देवसू माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून गेल्या बाव्वीस वर्षापासून शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. प्रथम क्रमांक कु शर्वरी श्रीकृष्ण आरोंदेकर (८८.६०% गुण), द्वितीय क्रमांक कु नुतन सुधीर नाईक हिने (८२.२० टक्के), तृतीय क्रमांक कु दीपेश विष्णू गावकर यांनी (७५.२०%) या विद्यार्थ्यांनी पटकाविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे गांगोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. लवू सावंत, सचिव मोहन गवस, उपाध्यक्ष प्रमोद परब शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक तसेच देवसू ओवळीये व पारपोली या तीन गावातील ग्रामस्थांनी व पालकांनी अभिनंदन केले आहे.