ओटवणे / प्रतिनिधी
चराठा उपसरपंच अमित परब आणि महेश पांचाळ यांचा पुढाकार
चराठा गावेडेशेत ते वाघाचा होंडा या जिल्हा परिषदेच्या रस्त्याची डागडुजी अभावी दयनीय अवस्था झाली. जिल्हा परिषदेकडे निधी नसल्यानेच हा रस्ता नूतनीकरणाच्या प्रतिक्षेत होता. त्यामुळे अखेर चराठा उपसरपंच अमित परब व महेश पांचाळ यांनी पुढाकार घेत लोकवर्गणीतून या रस्त्यांच्या नुतनीकरणास सुरुवात केली. त्यामुळे वाहनचालकांसह स्थानिक ग्रामस्थांमधुन समाधान व्यक्त होत आहे.गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत वाहन चालकांमध्ये नाराजी होती. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अनेक वेळा जिल्हा परिषद बांधकाम खात्याचे लक्ष वेधण्यात आले. परंतु निधीअभावी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे या धोकादायक रस्त्याच्या नूतनीकरणासाठी चराठा उपसरपंच अमित परब व महेश पांचाळ यानी पुढाकार घेत लोकवर्गणीतून या रस्त्यांच्या नुतनीकरणास सुरवात केली.