सांगरूळ /वार्ताहर
आषाढी वारी आळंदी ते पंढरपूर ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी सोहळ्यासाठी सांगरूळसह परिसरातील परिसरातील भाविकांनी आळंदी कडे प्रस्थान केले आहे .सांगरूळ सह परिसरात ह भ प गुरुवर्य वै .तात्यासाहेब वास्कर महाराज यांचा वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे .दरवर्षी आषाढी वारी आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यासाठी सांगरुळ परिसरातील म्हारुळ ,बहिरेश्वर ,खाटांगळे पासार्डे आमशी बोलोली परिसरातील वारकरी संप्रदायासह भाविक मोठ्या प्रमाणात दरवर्षी सहभागी होत असतात .गावागावातील पन्नास ते साठ भाविकांच्या लहान मोठ्या दिंड्या सहभाग घेतात . नियोजन करणे, दिंडी सोहळ्यात पंधरा-वीस दिवस पुरेल एवढे जेवणाचे साहित्य, विसाव्यासाठी पाल व अन्य साहित्याची जमवाजमव करण्यासाठी गेले महिनाभर भाविकांची जोरदार लगबग सुरू होती .
सांगरूळ मधून चालू वर्षी चार ग्रुप दिंडी सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत . गावातील ह भ प मंडळाच्या वतीने बाहेरी मंडप पासून गावातील विठ्ठल मंदिर पर्यंत टाळ मृदंग व पखवाजाच्या तालात दिंडी काढून तसेच आरती व पूजन करून दिंडी सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या . यानंतर हे सर्व वारकरी व भाविक दिंडी सोहळ्यात सहभाग घेण्यासाठी आळंदीकडे रवाना झाले . हे सर्व भाविक तात्यासाहेब वासकर यांच्या रथा पुढील दिंडी क्रमांक एक व सात मध्ये सहभागी होणार आहेत .
दिंडी सोहळ्यासाठी युवराज लव्हटे, दिनकर तळेकर, धोंडीराम खाडे वसंत खाडे आनंदराव खाडे बाळासो चव्हाण संभाजी खाडे कृष्णात नाळे संभाजी चव्हाण बाळासो सासणे गजानन पोतदार संभाजी मोरबाळे पोपट नाळे दत्तात्रय मगदूम आनंदी घुंगुरकर मंगल खाडे लक्ष्मी घुंगुरकर यांच्यासह दोनशेवर भाविक आळंदी कडे रवाना झालेत .
या भाविकांना शुभेच्छा देण्यासाठी दत्तात्रय जंगम, नामदेव खाडे, पांडुरंग खाडे ,कृष्णात लव्हटे, कृष्णात तोरस्कर ,नवनाथ लव्हटे ,वाय एस खाडे, जयवंत लव्हटे, गजानन शिवदे, लहुजी लव्हटे, हिंदुराव तोरस्कर यांचे सह ह भ प मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .