बेळगाव बेळगाव उत्तर मतदार संघातील भाजपचे उमेदवार डॉ रवी पाटील यांच्या प्रचारार्थ कोल्हापूरचे राज्यसभा सदस्य खासदार धनंजय महाडिक यांनी प्रचारपदयात्रा काढली. यमनापूर येथे त्यांनी प्रचारदौरा केला.
घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली. तसेच आलारवाड गावातील आंबेडकर गल्ली, जनता कॉलनी परिसरातही प्रचार केला. शहरातील शनिवार खूट, खडेबाजार, भोई गल्ली, बाजारपेठ परिसरात प्रचारदौरा करून व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या. बाजारपेठेतील व्यावसायिकांची समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.