Dhananjay Mahadik on Satej patil : महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यावर राज्यभरातील सर्वच कामांना स्थगिती दिली होती. पण माजी पालकमंत्री माझे नाव घेऊन इनडोअर स्टेडियमच्या कामाला स्थगिती दिली म्हणून टीका करतात. पण माजी पालकमंत्र्यांना पोटशूळ आहे. ते 15 वर्षे आमदार 8 वर्षे मंत्री होते. त्यांनी काय काम केलं सांगावं असा सवाल उपस्थित करत खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. आज ते कोल्हापुरात बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, थेट पाईपलाईन अडीच वर्षात पूर्ण करतो म्हणाले होते, मात्र आज 13 वर्षे झाले तरी काम अपूर्णच. यात त्यांनी ढपला पडला असं त्यांच्यापासून दूर गेलेल्या नगरसेवकांनी आरोप केला. कोल्हापूरचा टोल बंद व्हावा म्हणून आंदोलन सुरू असताना पावती फाडून यात ढपला पडल्याची कबुली त्यांनी दिली होती. ढपला पडायची ही त्यांची सवय आहे. कुणाचं तरी नाव घ्यायचं म्हणून त्यांनी माझं नाव घेतलं असेल. मी खासदार असताना किती निधी आणला हे सांगतो त्यांनी मंत्री असताना त्यांनी किती निधी आणला हे सांगावं. कोल्हापूर शहरावर टोल लादला होता ते पाप आहे, थेट पाईपलाईनने पाणी आणलं नाही हे पाप आहे अशीही टीका केली.
सतेज पाटील यांनी नेमका काय आरोप केला
जिल्ह्यात काही विकास कामांना स्थगिती आणली जातीय. जिल्ह्यात पहिलं 10 कोटीचे इनडोअर स्टेडियम मंजूर झालं. पण त्या कामाला खासदार धनंजय महाडिक यांनी स्थगिती आणली असा संशय आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी त्यांचा खुलासा करनं अपेक्षित आहे. हवे तर राज्यसरकारने आणखी 10 कोटी द्यावेत, पण हे स्टेडीयम रद्द करण्याच पाप करू नये. हा खेळाडूंच्यावर अन्याय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली, यावर आज धनंजय महाडिक यांनी टोला लगावला.